तळपला सुर्य - उन्हाळ्याची कविता
तळपला सुर्य आकाशी झळा झुकल्या अवनी भेगा कडाडल्या माती जणू दामिनीची पर्वनी ||१|| माणसा तुझीच किमया झाडं काटली किती तुझ्याचं भविष्याची तूला का नाही वाटली भिती ? ||२|| प्रदुषणाचा हा विळखा माणसा भोवला आता तूला वेळ झपाट्याने चालली कोण सावरीलं निसर्गाला?||३|| किती ओढवल्या आपत्ती माणसा स्वतः हून अंगावर वाढत्या रोगराईचा परिणाम बोचू लागला मनावर ||४|| नाही उरली नक्षत्रे वेळ काळ पाळायला वाटेल तेव्हा तीही लागली सडा गारांचा पाडायला ||५|| आता तरी सावर माणसा पुढील पिढ्या वाचवायला जगवून झाडांना तू आता शिक निसर्ग सांभाळायला ||६||